हिंदू जनजागृती समितीचे शिष्टमंडळ पोलिसात तक्रार दाखल करताना.
Spread the love
गोवा खबर : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याच्या प्रकरणी कोकणी साहित्यिक उदय भेंब्रे यांच्या विरोधात हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आज (4 रोजी) म्हापसा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
हिंदू जनजागृती समितीने तक्रारीत म्हटले आहे की, भेंब्रे यांनी राष्ट्रीय नायक आणि आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी खोटे, निराधार आणि विकृत ऐतिहासिक तथ्ये सादर करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. यामुळे सामाजिक सलोखा आणि शांतता यांना धोका पोहोचवून जातीय तणाव वाढवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न करण्यात आला आहे. भेंब्रे यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांच्या हेतुपुरस्सर खोट्या प्रचाराला आळा घालावा.
पोलिसात तक्रार दाखल करताना हिंदू जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये रमेश नाईक, चंद्रकांत (भाई) पंडित, जयेश थळी, गोविंद चोडणकर, शुभा सावंत आदींचा समावेश होता.