गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे एनएक्सटी कॉन्क्लेव्हमध्ये विविध मान्यवरांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. मान्यवरांमध्ये कार्लोस मोंटेस, प्रो. जोनाथन फ्लेमिंग, डॉ. अँन लिबर्ट, प्रा. वेसेलिन पोपोव्स्की, डॉ. ब्रायन ग्रीन, अलेक रॉस, ओलेग आर्टेमिव्ह आणि माइक मॅसिमिनो यांचा समावेश होता.
एक्स वरील वेगवेगळ्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले: आज एनएक्सटी कॉन्क्लेव्हमध्ये कार्लोस मोंटेस यांच्याशी संवाद साधला. सामाजिक नवोन्मेषाना गती देण्यात त्यांनी भरीव योगदान दिले आहे. डिजिटल तंत्रज्ञान, फिनटेक आणि इतर क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीचे त्यांनी कौतुक केले.

एमआयटी स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंटशी निगडित असलेले प्रा. जोनाथन फ्लेमिंग यांची भेट झाली. सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रात त्यांचे जीवन विज्ञानातील कार्य अनुकरणीय आहे. या क्षेत्रातील उदयोन्मुख प्रतिभावंताना आणि नवोन्मेषाना मार्गदर्शन करण्याची त्यांची आवड तितकीच प्रेरणादायी आहे, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले.