Connect with us

गोवा खबर

पं. कारेकर यांना आदरांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोमंत विभूषण पं. प्रभाकर कारेकर यांना आदरांजली वाहण्यासाठी कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे उध्या १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता संस्कृती भवन संकुल पाटो पणजी येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.  पं प्रभाकर कारेकर यांचे काल मुंबई येथे निधन झाले होते.

संबंधित संगीत प्रेमी, पं. कारेकर यांचे चाहते व रसिकांनी या शोकसभेत सहभागी व्हावे असे आवाहन कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे करण्यात आले आहे.