गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराज येथे महाकुंभाला भेट दिली आणि संगमावर जाऊन पवित्र स्नान केले.
एक्स या समाज माध्यमावर लिहिलेल्या स्वतंत्र संदेशात त्यांनी म्हटले आहे: “प्रयागराज येथे महाकुंभाला जाण्याचा पवित्र योग आला हे भाग्य. संगमावर स्नान करणे हा दिव्य संयोगाचा क्षण आहे आणि या कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या कोट्यवधी जनांप्रमाणे मी सुद्धा येथील दिव्यत्वाच्या अनुभूतीने भारून गेलो आहे. शांती, शहाणीव, उत्तम आरोग्य आणि सुसंवाद यांचा आपणा सर्वांना माता गंगेचा आशीर्वाद लाभो.”