Connect with us

गोवा खबर

दक्षिण जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे गतिरोधक उभारण्याचे आदेश

Published

on

Spread the love

गोवा खबर : दक्षिण जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मुरगाव तालुक्यातील मुरगाव नगरपालिका क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांवर हंप प्रकारचे गतिरोधक अधिसूचित केले आहेत आणि त्यावरील सावधानतेचे फलक लावण्याचे निर्देश दिले आहेत. वडडेम जंक्शन राष्ट्रीय महामार्ग ३६६ पासून लास्ट बस स्टॉप न्यू वाडेकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर, मुख्य जंक्शनच्या सुमारे २० मीटर आधी आणि सुमारे ३० मीटर नंतर एक हंप प्रकारचा गतिरोधक उभारण्यात येईल.

त्याचप्रमाणे लिटिल एंजल स्कूलच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पुढे सुमारे ५ मीटर अंतरावर, वाडे जंक्शन राष्ट्रीय महामार्ग ३६६ पासून लास्ट बस स्टॉप न्यू वाडेकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर एक हंप प्रकारचा गतिरोधक उभारला जाणार आहे. तसेच मांगूरहून बायणाकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर, अंबाबाई मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून सुमारे १० मीटर अंतरावर, एक हंप प्रकारचा गतिरोधक उभारण्यात येणार आहे.

खारीवाडेहून चिखली-मांगूरकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर टी चौकाच्या सुमारे १५ मीटर अंतरावर एक हंप प्रकारचा स्पीड ब्रेकर उभारण्यात येणार आहे, ड्रीम लँड टी इंटरसेक्शनच्या सुमारे १५ मीटर अंतरावर फादर जोस वाझ अंतर्गत रस्त्यावर एक हंप प्रकारचा गतिरोधक उभारण्यात येणार आहे, वास्कोहून वरुणापुरीकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर मुख्य मांगूर हिल जंक्शनच्या सुमारे २० मीटर अंतरावर एक हंप प्रकारचा गतिरोधक उभारण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे मुख्य मांगोर हिल जंक्शन नंतर सुमारे ५० मीटर अंतरावर म्हणजे वास्को स्पोर्ट्स क्लबच्या अगोदर. मुख्य मांगोर हिल जंक्शनपासून सुमारे १० मीटर अंतरावर, मांगोर हिल जंक्शनपासून बायणाकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर एक हंप प्रकारचा गतिरोधक उभारण्यात येणार आहे.

मांगोर हिल जंक्शनपासून बायणाकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर, अल्टो ब्रिटो स्पोर्ट्स क्लब जंक्शनच्या अगोदर आणि नंतर सुमारे १५ मीटर अंतरावर एक हंप प्रकारचा गतिरोधक उभारण्यात येणार आहे. सिद्धिविनायक वाड्यापासून सेंट तेरेझा शाळेकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर, अल्टो ब्रिटो स्पोर्ट्स क्लब जंक्शनच्या अगोदर आणि नंतर सुमारे १५ मीटर अंतरावर एक हंप प्रकारचा गतिरोधक उभारण्यात येणार आहे आणि वास्को येथील राजा तारा इमारतीजवळील टिळक मैदान जंक्शनच्या सुमारे १५ मीटर अंतरावर टिळक मैदान जंक्शनपासून खारीवाडाकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर एक हंप प्रकारचा गतिरोधक उभारला जाईल. दंडाधिकाऱ्यांनी आवश्यक ते सूचना फलकही उभारण्याचे आदेश दिले आहेत.