गोवा खबर : राज भवनातील श्री गणेश मंदिरात १ फेब्रुवारी २०२५ रोजी भगवान श्री गणेशाच्या जन्मोत्सवानिमित्त राजभवन रिक्रिएशनल संस्थेने सकाळी ९.०० वाजल्यापासून गणेश यज्ञाचे आयोजन केले आहे. त्यानंतर महा आरती आणि महाप्रसाद होईल.
भगवान गणेशाच्या जन्मोत्सवासाठी सर्व भक्तांना व जनतेला सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. मुख्य प्रवेश व्दारावर फोटो ओळखपत्र दाखविल्यानंतरच भाविकांना व जनतेला राजभवन कॅम्पसमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली जाईल. सर्व भाविकांनी आपली वाहने राजभवन हेलिपॅडवर पार्क करावी आणि सुरक्षेच्या कारणास्तव लोकांनी त्या दिवशी कोणतीही हँडबॅग सोबत आणू नये. सकाळी ९.०० वाजल्यापासून राजभवनाच्या गेटमधून प्रवेश दिला जाईल.