Connect with us

गोवा खबर

मिनेझिस ब्रागांझा संस्थेतर्फे दिव्यांगासाठी व्हीलचेअर सुविधा उपलब्ध

Published

on

Spread the love

गोवा खबर : मिनेझिस ब्रागांझा संस्थेत  आयोजित करम्यात येणाऱ्या विविध कार्यकमात दिव्यांग व्यक्तींना हजर राहण्यास सोयीस्कर व्हावे म्हणून सदर संस्थेने व्हीलचेअर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा उपलब्ध केल्याने दिव्यांगाना पायऱ्या चढण्यास सुरक्षित आणि सुलभ होईल.

मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यास कोणालाही अडचण येऊ नये आणि दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा २०१६ च्या तरतुदीच्या अंमलबजावणीच्या उद्देशाने ही व्हीलचेअर सुविधा उपलब्ध केली आहे.

मिनेझिस ब्रागांझा संस्थेने येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्ष दशरथ परब यांच्या हस्ते या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले.  मिनेझिस ब्रागांझा संस्थेचे सदस्य सचिव अशोक परब हे यावेळी उपस्थित होते.