गोवा खबर:राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी दसरा या विजयादशमी निमित्त गोव्यातील लोकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात “दसरा विजयादशमीच्या उत्साहाने नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांच्या उत्सवाची सांगता होते. या सणाचा प्रत्येक प्रातांत आध्यात्मिक अर्थ वेगळा असला तरी वाईट प्रवृत्तीवर मिळविलेल्या विजयाची मूळ भावना तशीच आहे. अशा उत्सवाने लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि देशाची एकता आणि अखंडता राखण्यात उल्लेखनीय भूमिका बजावली आहे. राज्यपाल पुढे म्हणतात, “आज जेव्हा जग असहिष्णुता, द्वेष आणि हिंसेच्या दुष्टतेने ग्रासलेले असताना आपण सहिष्णुता, बंधुता आणि शांतता या महान मूल्यांप्रती वचनबद्ध होऊया”.
या वर्षाचा दसरा हा सण गोव्यातील लोकांना अधिक शांतता, आनंद आणि समृद्धी घेऊन येवो” असे राज्यपाल आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.