Connect with us

गोवा खबर

तर १ जुलैपासून पाणी वापरावार निर्बंध!

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यात मान्सून लांबल्याने जलसंकट अधिक गडद झाले असून पुढील १५ दिवसांत पाऊस न पडल्यास १ जुलैपासून पाण्याच्या वापरावर कडक निर्बंध लादले जातील, अशी माहिती पेयजलमंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली आहे.

सद्यस्थितीत राज्यात पर्जन्यमानात तब्बल ५९ टक्क्यांची टूट नोंदवली गेली आहे. जल साठ्याबाबत चिंता वाढली असून अंजुणे धरणातील पाणीसाठा केवळ १० टक्क्यांवर आला आहे. नवीन नियमांनुसार पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य दिले जाईल आणि नळातून गाड्या धुण्यास किंवा झाडांना पाणी मारण्यास पूर्णपणे बंदी असेल.

दरम्यान, म्हैसाळ आणि पंचवाडी धरणात १८.७३ टक्के साठा शिल्लक असून तो पुढील २० ते २५ दिवस पुरेल इतका आहे. जनतेने पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मंत्र्यांनी केले आहे.