Connect with us

गोवा खबर

भाजपच्या विशेष जनसंपर्क अभियानात दामू नाईक यांचा सहभाग

Published

on

Spread the love

गोवा खबर : भाजपच्या फातोर्डा मतदारसंघातील विशेष जनसंपर्क अभियानात प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह सहभाग घेतला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या गेल्या १२ वर्षांतील विकासकामांची आणि विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली.

दामू नाईक यांनी सांगितले की, गेल्या १२ वर्षांत देशात पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना मिळाली असून सामाजिक कल्याणकारी योजनांद्वारे सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचे काम करण्यात आले आहे. गरीब, शेतकरी, महिला आणि युवकांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले आहेत.

देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि ‘विकसित भारत’ या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी या १२ वर्षांत मजबूत पाया रचण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. अभियानादरम्यान कार्यकर्त्यांनी नागरिकांशी संवाद साधून सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली.