गोवा खबर : सरकारी मराठी शाळा पालकांमुळे बंद पडत आहेत, असे विधान करून मुख्यमंत्री सावंत यांनी स्वतःच्या अपयशाची कबुली दिली आहे, असा आरोप मराठी राजभाषा निर्धार समितीचे निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी केला आहे.
शिक्षक भरतीतील विलंब, एकशिक्षकी शाळा, तुटपुंजं प्रशिक्षण, पालकांशी अपुरा संवाद आणि २०१२ पासून इंग्रजी शाळांना दिलं जाणारं अनुदान यामुळे मराठी शाळा संकटात सापडल्या आहेत.
विद्याभारतीने बंद पडणाऱ्या शाळा जपल्या, तर सरकारने ती जबाबदारी झटकली, असा आरोपही त्यांनी केला. “पालकांच्या नावावर खापर फोडून जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न सरकारने करू नये,” असे वेलिंगकर यांनी स्पष्ट केले.