गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेल्जियमच्या राजकन्या ऍस्ट्रीड यांची भेट घेतली. भारतभेटीवर आलेल्या 300 सदस्यांच्या आर्थिक शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

X समाजमाध्यमावरील संदेशात त्यांनी म्हटले आहे : “बेल्जियमच्या राजकन्या ऍस्ट्रीड यांना भेटून आनंद झाला. भारत भेटीवर आलेल्या 300 सदस्यांच्या आर्थिक शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार खूप कौतुकास्पद आहे. व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण, कृषी, नवोन्मेष, कौशल्य आणि शैक्षणिक आदानप्रदान या नवीन भागीदारीच्या माध्यमातून आपल्या देशातील नागरिकांसाठी अमर्याद संधी खुल्या करण्यासाठी उत्सुक आहे.”