गोवा खबर : दक्षिण गोवा जिल्हा दंडाधिकार्यांनी एका आदेशाद्वारे दक्षिण गोवा भागातील सर्व हॉटेल्स, लॉजिंग आणि बोर्डिंग, खाजगी गेस्ट हाऊस, पेइंग गेस्ट निवास, तात्पुरती निवासी व्यवस्था करणार्या घर मालकांना, धार्मिक संस्थाना आपल्याकडे येणार्या ग्राहकांची ओळख पटवण्यासाठी ग्राहकांकडून मतदार कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, स्मार्ट कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट यासारख्या ओळखपत्रांची मागणी करावी, असे म्हटले आहे.

ओळख पटविल्याशिवाय ग्राहकांना आपल्या हॉटेलात किंवा घरांत प्रवेश देऊ नये. तसेच मालकांनी आपले ग्राहक, भाडेकरूंची माहिती जवळच्या पोलीस खात्याने तयार केलेल्या पथिक या सॉफ्टवेरमध्ये नोंद केली पाहिजे. मालकांनी आपल्या ग्राहकांची आणि भाडेकरूंची माहिती जतन करून ठेवावी आणि गरज असते तेव्हा अशी माहिती पोलीस यंत्रणेस उपलब्ध करावी. तसेच दक्षिण गोव्यातील राष्ट्रीयकृत बँक प्रमुखानी आपल्या एटीएममध्ये पूर्णवेळ सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, असा आदेश देण्यात आला आहे.