गोवा खबर : भारतीय वायुसेनेने अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीरवायू म्हणून भारतीय सशस्त्र दलात सामील होण्यासाठी अविवाहित भारतीय पुरुष आणि महिला उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविले आहेत.
यासाठी ऑनलाइन नोंदणी ७ जानेवारी २०२५ पासून सुरू झाली आहे आणि २७ जानेवारी २०२५ रोजी रात्री ११.०० वाजेपर्यंत सुरू राहील. केवळ ऑनलाइन नोंदणीकृत अर्ज स्वीकारले जातील. अर्ज भरण्यासाठी तपशीलवार माहिती https://agnipathvayu.cdac.in वर उपलब्ध आहे.