गोवा खबर : आज इतर धर्मियांच्या उत्सवांसाठी सरकार कोट्यवधी रुपये अनुदान देते; मात्र हिंदूंच्या उत्सवांकडे दुर्लक्ष केले जात आहे. हिंदूंच्या उत्सवांना मुलभूत साधनसुविधा उपलब्ध करून दिला जात नाही. यामुळे उत्सवांमध्ये भाविकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. संघटित नसल्याने हिंदूंना आज गृहीत धरले जात आहे. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी हिंदूंनी संघटित होणे काळाची गरज आहे. हिंदूंनी आपल्या मागण्या शासनाकडे लावून धरूल्या पाहिजे, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक सत्यविजय नाईक यांनी केले.
हिंदू जनजागृती समितीने बाप्सोरा, बेतुल येथे श्री राम मंदिर सभागृहात आयोजित हिंदूराष्ट्र-जागृती सभेत नाईक मार्गदर्शन करत होते. या वेळी सनातन संस्थेच्या सुश्री संगीता नाईक यांची व्यासपिठावर उपस्थिती होती.
सनातन संस्थेच्या सुश्री संगीता नाईक यांनी या वेळी ‘आनंदप्राप्तीसाठी साधना’ याविषयावर मार्गदर्शन करतांना ‘गुरुकृपायोगा’नुसार साधना करण्याचे महत्त्व विषद केले. सभेत उपस्थित हिंदू धर्माभिमान्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कटीबद्ध होण्याची शपथ घेतली. सभेच्या अखेर उपस्थित हिंदुत्वनिष्ठांच्या उपस्थितीत गटचर्चा घेण्यात आली. गटचर्चेमध्ये राष्ट्र ्आणि धर्मरक्षणासाठी दर महिन्याला एका रविवारी एकत्र येण्याचे निश्चित करण्यात आले. आभार प्रदर्शन श्री कृष्ण मंदिराचे अध्यक्ष प्रमोद जुवेकर यांनी केले.