-
अॅड. उदय भेंब्रे आणि संदेश प्रभुदेसाई यांची विशेष व्याख्याने
गोवा खबर : जनमत दिवसानिमित्त राजभाषा संचालनालयाने उत्तर आणि दक्षिण गोव्यात विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले. दक्षिण गोव्यात केपे येथील सरकारी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या एम. ए. कोंकणी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ओपिनियन पोल: गोव्याच्या अस्तित्वाची चळवळ या विषयावर एक विशेष कार्यक्रमआयोजित करण्यात आला.
लेखक अॅड. उदय भेंब्रे यांनी जनमत कौल दिवसाच्या आठवणी आणि घटनांची माहिती दिली. ओपिनियन पोल स्वतः अनुभवलेले ॲड. उदय भेंब्रे यांनी १९६३ ते १९६७ काळातील महत्वाच्या प्रसंगांवर प्रकाश टाकला. या दिवसामुळे गोव्याचे अस्तित्व जपले असे अॅड. भेंब्रे म्हणाले.
राजभाषा संचालक प्रशांत शिरोडकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जॉयदीप भट्टाचार्जी, कार्यक्रम समन्वयक प्रा. दीपराज सातोर्डेकर, एम. ए. कोंकणी विभागाचे प्रमुख सुशांत नायक, कनिष्ठ अनुवादक स्नेहा सबनीस, बी.ए. कोंकणी विभागाच्या प्रमुख डॉ. राखी आमोणकर, प्रा. जोफा गोन्साल्विस, प्रा. ग्लिनिस डायस, प्रा. शमिका बाळ्ळीकर आणि इतर शिक्षक तसेच विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

जनतेला जनमत कौल दिवसाबद्दल योग्य माहिती देण्यासाठी अॅड. उदय भेंब्रे हे योग्य व्यक्ती आहेत आणि म्हणून विद्यार्थ्यांना या दिवसाची ओळख करून देण्यासाठी आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी दोन कार्यक्रम आयोजित करण्यात आले असे संचालक प्रशांत शिरोडकर यांनी सांगितले. प्राध्यापक सुशांत नायक यांनी स्वागत केले. प्राध्यापक दिपराज सातोर्डेकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. अनुवादक स्नेहा सबनीस यांनी आभार मानले.
उत्तर गोव्यात, खांडोळा येथील सरकारी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या कोंकणी विभाग आणि राज्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने जनमत कौल दिवस कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक संदेश प्रभुदेसाई यांनी जनमत कौलाच्या इतिहासावर प्रकाश टाकला. जनमत कौलाच्या दिवशी गोव्याला स्वतंत्र अस्तित्व मिळाले आणि त्या काळात तरुणांनी मोठ्या प्रमाणात योगदान दिल्याचेही संदेश प्रभुदेसाई यांनी पुढे सांगितले. याच दिवसामुळे गोमंतकीय आज आपले विचार व्यक्त करू शकतात, असे ते पुढे म्हणाले.
राजभाषा उपसंचालक अनिल सावंत यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. पुर्णकला सामंत यांनी स्वागत केले. प्रा. पृथ्वी नायक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि मान्यवरांचा परिचय करून दिला. प्रा. दिव्या गोवेकर यांनी आभार मानले. कोंकणी विभागाचे प्रमुख प्रोफेसर प्रकाश वजरीकर, राज्यशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. सीमा साळगांवकर, प्रा. डॉ. रेश्मा खोलकर, प्रा. किरण पालकर, प्रा. निलेश नायक, प्रा. अकबर गदेड, प्रा. डॉ. नवू वरक आणि विविध विभागांचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
दोन्ही कार्यक्रमांमध्ये सुमारे २३० विद्यार्थी, शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांना जनमत कौल दिवसाबद्दल माहिती मिळाली.