Connect with us

गोवा खबर

मिठागरे, खारफुटींसाठी आता जीआयएस मॅपिंग : वनमंत्र्यांची माहिती

Published

on

Spread the love

गोवा खबर : वाढती पर्यावरणीय आव्हाने विचारात घेता राज्यातील मिठागरे आणि खारफुटीचे संरक्षण करण्यासाठी वनखात्यातर्फे जीआयएस तंत्रज्ञानासह सामुदायिक मॅपिंग केले जाणार आहे. वनमंत्री विश्वजीत राणे यांनी तसे आदेश वनखात्याला दिले आहेत.

राज्यातील पर्यावरणीय समतोल आणि सामाजिक, आर्थिक लवचिकता सुनिश्चित करण्यासाठी या क्षेत्रांचे रक्षण करणे महत्त्वाचे असल्याचे वनमंत्र्यांचे म्हणणे आहे.

मिठागरे आणी खारफुटी यांचे संरक्षित क्षेत्र म्हणून मान्यता मिळावी, तसेच जैवविविधता जतन करून स्थानिक उपजीविकेला आधार द्यावा, हा या मागचा मुख्य उद्देश आहे.

राज्यातील मिठागरे आणि खारफुटीचे संरक्षण करण्यासाठी एका केंद्रित दृष्टिकोनाची आवश्यकता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.