Connect with us

गोवा खबर

गोवा विधिकार दिवस साजरा

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा विधिकार मंच्याने पर्वरीतील विधानसभा प्रकल्पात आयोजित केलेल्या कार्यक्रमात गोवा विधिकार दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमास आजी-माजी आमदार आणि खासदारांची उपस्थिती होती.

यावेळी डॉ. प्रमोद सावंत यांनी एकत्रितपणे बैठक घेतल्याबद्दल मंचाचे कौतुक केले. सावंत यांनी सरकार म्हादई नदीचा प्रश्न, स्वच्छ आणि हरित गोवा इत्यादी विषयांवर मंचाने मांडलेल्या समस्या आणि सूचनांचा विचार करणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी सरकार सुधारणा आणण्याचे काम करीत असून त्यासाठी आर्थिक तरतुद करणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी गोवा राज्याच्या विधानसभेच्या (१९८९-९४) सदस्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी या सर्वांचे अभिनंदन करून गोवा राज्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले.

सभापती रमेश तवडकर यांनी गोवा विधिकार मंचाने मंच्याच्या कार्याचे महत्व प्रतिपादले. नवीन नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला असाच एक उपक्रम युवा संसद यावर त्यांनी प्रकाश टाकला. गोव्याचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी सर्वांनी चांगली भूमिका बजावयाची आहे असे त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते, युरी आलेमांव यांनी आपल्या भाषणात म्हादई नदीचे पाणी वळविणे, कॅसिनोचे नुकसान आणि गोव्याची प्रतिमा कशी डागाळत चालली आहे यासारख्या मुद्द्यांवर आवाज उठवणे आणि ते सोडविणे आवश्यक आहे असे सांगितले.

गोवा विधिकार मंचाचे कोषाध्यक्ष सदानंद मळिक यांनी फोरमचा २०२३-२४ वर्षाचा लेखा अहवाल सादर केला. सुरवातीस  गेल्या वर्षी निधन झालेल्या मंचाने माजी सदस्य आणि आमदार फ्रान्सिस्को मोंत क्रूझ आणि सुरेश परुळेकर यांच्या निधनाबद्दल मंचाने शोक व्यक्त केला.

मंचाचे उपाध्यक्ष व्हिक्टर गोन्साल्विस यांनी आभार मानले. विधीमंडळाच्या सचिव नम्रता उलमन यावेळी उपस्थित होत्या.