Connect with us

गोवा खबर

राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन साजरा

Published

on

Spread the love

गोवा खबर:नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार सचिव श्री संजित रॉड्रिग्स आयएएस यांनी ग्राहक हक्क चळवळींमुळे लोकांमध्ये ग्राहक म्हणून असलेल्या हक्कांबद्दल जागरुकता निर्माण झाली आहे आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण केले आहे असे सांगितले. आणि त्यामुळे चळवळीला महत्त्व प्राप्त झाले आहे असे राष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संबोधित करताना त्यांनी सांगितले. नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार खात्यातर्फे शहरातील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात ग्राहक हक्क दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

श्री रॉड्रिग्स यांनी ग्राहक हक्क चळवळ तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या गरजेवर भर देताना सांगितले की फसवणूक आणि फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे लक्षात येत असून त्यामुळे लोकांमध्ये त्यांच्या ग्राहक हक्कांबद्दल शिक्षित करणे आणि जागृती करणे आवश्यक झाले आहे असे ते म्हणाले.

 श्री. रॉड्रिग्स यांनी सरकारने लोकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी विविध कायदे केले आहेत जे पुरेसे नाहीत कारण लोकांना समान प्रतिसाद आणि सहकार्य केले पाहिजे असे ते म्हणाले. राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन साजरा करणे ही आमच्यासाठी ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणाच्या कारणाप्रती असलेल्या आमच्या वचनबद्धतेचे नूतनीकरण करण्याचा एक प्रसंग आहे असे ते पुढे म्हणाले.

डायरेक्ट सेलिंग टुडेचे मुख्य संपादक  श्री राहुल सुदान यामनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे आधुनिक ग्राहक आणि आधुनिक डायनॅमिक बिझनेस लँडस्केपचे सक्षमीकरण याबद्दल उपस्थितांना माहिती दिली.

गोवा राज्य ग्राहक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या २०२३ वर्षाच्या लँडमार्क जजमेंट्सवरील मासिकाचे प्रकाशन प्रमुख पाहुणे श्री संजीत रॉड्रिग्स यांच्या हस्ते करण्यात आले.

गोवा राज्य ग्राहक आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती. बेला एन. नाईक, गोवा कॅनचे समन्वयक श्री रोलँड मार्टिन्स, ग्राहक, विद्यार्थी, नागरी पुरवठा खात्याचे कर्मचारी व इतर उपस्थित होते.

नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार खात्याचे संचालक श्री जयंत तारी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.