Connect with us

गोवा खबर

मुख्यमंत्र्यांकडून गोव्यातील लोकांना गोवा मुक्तीदिनाच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील लोकांना १९ डिसेंबर १९६१ रोजी ४५०    वर्षांच्या पोर्तुगीज राजवटीतून स्वातंत्र्य मिळविलेल्या आपल्या सुंदर गोवा राज्याच्या मुक्ती दिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. हा दिवस खरोखरच ऐतिहासिक आणि उल्लेखनीय आहे असे मुख्यमंत्री म्हणतात.

आपल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, गोवा मुक्ती दिन हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे पोर्तुगीजांच्या राजवटीनंतर १९६१ मध्ये गोव्याचे भारतीय संघराज्यात एकीकरण झाले. सांस्कृतिक उत्साह आणि अभिमानाने साजरा केला जाणारा हा दिवस स्वातंत्र्याच्या अटळ लढ्याचे दर्शन घडवितो. दीर्घकाळ चाललेल्या स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांचे शौर्य आणि योगदान आज आम्ही अभिमानाने स्मरण करतो.”

मुक्ती संग्राम, दृढनिश्चयाचा परिणाम आमच्या अंतःकरणात वचन आणि आशेने भरतो कारण आम्ही आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी राज्य तयार करण्यासाठी आपण एकत्र उभे राहिले पाहिजे. गोव्याच्या लोकांनी अतुलनीय धैर्याने आणि दृढनिश्चयाने १९६१ मध्ये त्यांचे स्वातंत्र्य परत मिळविले, गोव्यातील लोक कशाप्रकारे स्वातंत्र्य आणि सलोख्यासाठी एकत्र, आले तो दिवस साजरा करण्याचा हा प्रसंग असल्याचे मुख्यमंत्री म्हणतात.


आपल्या संदेशात मुख्यमंत्री  पुढे म्हणतात “गेल्या काही वर्षांत गोव्याचा प्रगतीशील राज्यात बदल झाला असून आपल्या देशाच्या सामाजिक-आर्थिक सामर्थ्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. लोकांच्या जिद्द आणि मेहनतीने गोव्याला विकासाचे ज्वलंत उदाहरण बनविले आहे. राज्याच्या विकासासाठी सरकार विविध मार्गांनी गतिमानपणे काम करीत आहे. गोवा राज्य आज सर्व क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य बनले आहे आणि राज्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी सरकार नेहमीच कटिबद्ध आहे. आपण सर्व मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने प्रयत्न करून स्वावलंबनाच्या ध्येयाकडे वाटचाल करूया.

माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विशेष उल्लेख केला, ते म्हणाले, “गोवा मुक्ती दिनाच्या या महत्त्वपूर्ण प्रसंगी, ज्यांच्या बलिदानामुळे आपले स्वातंत्र्य शक्य झाले, त्या शूर शहीदांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सबका साथ या संकल्पनेअंतर्गत, सबका विकास, सबका विश्वास, शहीदांच्या अमूल्य योगदानाचा गौरव करण्यासाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गोवा सरकारने यावर्षी हुतात्म्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आणि गोवा मुक्ती चळवळीत हुतात्मे झालेल्या १५ शहीद जवानांच्या पयल्या पिढीचे म्हणजे मूलगा मुलीचा राज्य सरकारने गोवा मुक्ती दिनाच्या पुर्व संध्येला १८ डिसेंबर २०२४ रोजी प्रत्येकी १० लाख रूपये आणि प्रमाणपत्रे देऊन सत्कार केला.

 गोवा मुक्ती चळवळीला बळकट करण्यासाठी आपण सर्व सैनिकांचे स्मरण करूया. असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.