Connect with us

गोवा खबर

डॉ. रॉड्रिग्स यांचा सी. व्ही. सुब्रमण्यन स्मृती पुरस्काराने सन्मान

Published

on

Spread the love

गोवा खबर : वनस्पतिशास्त्राचे वरिष्ठ प्राध्यापक आणि सध्या स्कूल ऑफ बायोलॉजिकल सायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी, गोवा विद्यापीठाचे डीन डॉ. बर्नार्ड रॉड्रिग्स यांना मायकोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियातर्फे मायकोलॉजी क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रा. सी. व्ही. सुब्रमण्यन स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

26 ते  29 नोव्हेंबरपर्यंत जय नारायण व्यास युनिव्हर्सिटी, जोधपूर, राजस्थान यांच्या वनस्पतिशास्त्र विभागाद्वारे आयोजित एमएसआयच्या 51 व्या वार्षिक सभेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.