गोवा खबर : भारताचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या जयंतीनिमित्त 13 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता त्यांच्या स्मृती स्थळी मिरामार येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मान्यवर समाधीवर पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली अर्पण करतील.