गोवा खबर : बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिवस. समता आणि मानवी प्रतिष्ठेसाठी आंबेडकरांनी दिलेला अथक लढा अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आहे, असे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नमूद केले आहे.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधान म्हणाले, आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार आणि सामाजिक न्यायाचे दीपस्तंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण प्रणाम करु या!
समता आणि मानवी प्रतिष्ठेसाठी डॉ. आंबेडकरांनी दिलेला अथक लढा अनेक पिढ्यांना आजही प्रेरणा देत आहे. आज त्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करत असताना आम्ही त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो.