Connect with us

गोवा खबर

नवी दिल्लीत संसद भवन संकुल प्रेरणा स्थळ इथे 6 डिसेंबर 2024 रोजी 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुण्यस्मरण

Published

on

Spread the love

 

 

गोवा खबर:डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण  दिनानिमित्त 6 डिसेंबर 2024 रोजी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने डॉ. आंबेडकर फाउंडेशनतर्फे  प्रेरणा स्थळ, संसद भवन संकुल येथे त्यांचे पुण्यस्मरण  केले जाणार आहे.

या कार्यक्रमात सकाळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, संसद सदस्य आणि इतर अनेक मान्यवर पुष्पांजली अर्पण करतील.

 

त्यानंतर, प्रेरणा स्थळ, संसद भवन परिसर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी हा संपूर्ण कार्यक्रम जनतेसाठी खुला केला जाईल. नवी दिल्ली येथील पंडित पंत मार्ग स्थित  संसद ग्रंथालय इमारतीजवळील गेट क्रमांक 1 मधून संसद भवन परिसरात  सकाळी 9.30 ते दुपारी 12.30 पर्यंत जनतेला प्रवेश दिला जाईल. यासाठी  गेट क्रमांक 1, पंडित पंत मार्ग येथून संसद भवन परिसरात प्रवेश करण्यासाठी कोणत्याही पास किंवा निमंत्रणाची आवश्यकता नाही.