Connect with us

गोवा खबर

स्वामी गोविंददेव गिरिजी आणि डॉ. आठवले यांची ‘सनातन आश्रमा’त हृद्य भेट !

Published

on

Spread the love
 
भारताला जगात सर्वोच्च स्थानावर पोहोचवण्यात ‘सनातन आश्रमा’चे योगदान सर्वांत मोठे असेल !  स्वामी गोविंददेव गिरिजी

गोवा खबर:सनातन संस्थेच्या आश्रमात येऊनया पुण्यभूमीत उपस्थित राहून त्याचे पूर्णपणे अवलोकन केल्यावर मला अत्यंत आनंद झालाकेवळ गोवाच नाहीतर आजूबाजूच्या प्रदेशांनाही ‘तपोभूमी’ बनवण्यात ‘सनातन आश्रमा’चे मोठे योगदान आहेया आश्रमातील उर्जेमुळे लोकांच्या मनोभूमिकेत गेल्या २५ वर्षांमध्ये जे बदल झाले आहेतते आपण अनुभवत आहोतआता ही ऊर्जा अधिक वेगाने कार्य करत आहेहेही जाणवतेम्हणूनच मला विश्वास आहे कीयेत्या काही काळात आपला भारत देश संपूर्ण जगात सर्वोच्च स्थानावर पोहोचेल आणि या कार्यात या ‘सनातन आश्रमा’चे सर्वांत मोठे योगदान असेलअसे गौरवोद्गार ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरिजी यांनी गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला भेट दिल्यावर काढले.

     या प्रसंगी सनातन संस्थेचे संस्थापक  डॉजयंत बाळाजी आठवले आणि  स्वामी गोविंददेव गिरिजी यांची सनातन आश्रमात हृद्य भावभेट झाली. सनातन आश्रमाच्या भेटीनंतर बोलतांना प.पूस्वामीजी पुढे म्हणाले कीआपण भारताला पूर्वीसारखे महान राष्ट्र बनवू इच्छितोमात्र भारत विश्वगुरूच्या स्थानावर सहज पोहोचणार नाहीयासाठी कुठेतरी उर्जेचा प्रवाह आवश्यक आहेजसे मुंबईच्या भाभा अणुऊर्जा केंद्रातून ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा आपण सर्वत्र वापरतोतसेच हा ‘सनातन आश्रम’ आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करत आहेही ऊर्जा आसमंतात पसरून लोकांच्या मनोभूमिका प्रभावित करत हिंदू राष्ट्राच्या निर्माणासाठी कार्य करत आहे.

    जसे विविध महात्म्यांनी विविध ठिकाणी तपश्चर्या केली आहेत्याचा प्रभाव वेळोवेळी धर्माला जागृत करून तो भारताला विश्वकल्याणासाठी समर्थ बनवतोतसेच या राष्ट्राला सामर्थ्य देणार्‍या उर्जेचा केंद्रबिंदू हा सनातन आश्रम आहेया केंद्राला मी अत्यंत आदरपूर्वक नमन करतोया उर्जेच्या मूळ प्रवाह पूजनीय डॉजयंत आठवले यांच्या दर्शनातून आलात्यांच्या व्यक्तिमत्त्वाने मला अत्यंत आनंदित आणि प्रभावित केले आहेमी त्यांना सुद्धा अत्यंत श्रद्धेने वंदन करतोमी सर्वांना गीता शिकवतोती गीता सनातन आश्रमात आचरणात आणली जातेअसे पाहायला मिळालेछत्रपती शिवाजी महाराजांचे नियोजन कौशल्य हे ‘मायक्रो मॅनेजमेंट’ (सूक्ष्मव्यवस्थापनहोतेतसेच सनातन आश्रमाचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’ शिकण्यासारखे आहेअसेही स्वामीजी म्हणाले.