Connect with us

गोवा खबर

मंत्रोच्चार, अग्नीहोत्र, यज्ञ, साधना याद्वारे पर्यावरणाचे संतुलन राखले जाऊ शकते?

Published

on

संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत विषय सादर करतांना शॉन क्लार्क.
Spread the love

गोवा खबर : प्राचीन भारतीय शास्त्रांनुसार विश्व हे काळचक्रानुसार वरखाली होत असतेरजतमोगुणाचे प्राबल्य वाढल्यामुळे त्याचा नकारात्मक प्रभाव पृथ्वीआपतेजवायू आणि आकाश या पंचमहाभूतांवर पडतोपरिणामस्वरूप पृथ्वीवरील नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढतेत्यामुळे जागतिक पातळीवर केवळ स्थुलातील उपायांविषयी प्रयत्न केले जात आहेतपण ते पुरेसे नाहीतआध्यात्मिक पातळीवरही प्रयत्न होणे अत्यावश्यक आहेतमंत्रोच्चारअग्नीहोत्रयज्ञसाधना आदींद्वारे आपण आपल्या आयुष्याची आणि पर्यावरणाची आध्यात्मिक शुद्धी होऊ शकते आणि त्याद्वारे पर्यावरणाचे संतुलन राखले जाऊ शकतेअसे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे शॉर्न क्लार्क यांनी केले.

ते अझरबैजानची राजधानी बाकू येथे ‘संयुक्त राष्ट्रसंघा’ने (UN) आयोजित केलेल्या ‘सीओपी२९’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलत होते. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय आणि स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन यांच्या वतीने क्लार्क यांनी ‘सामाजिक सजगतेमुळे पर्यावरणाची हानी अल्प करता येईल का?’ या विषयावरील संशोधन सादर करतांना यज्ञाचे काही व्हिडिओ आणि छायाचित्रेही सादर केलीहे संशोधन डॉजयंत बाळाजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

क्लार्क यांनी सांगितलेआध्यात्मिक शुद्धतेचा अर्थात् सात्त्विकतेचा पंचमहाभूतांवर परिणाम होतोहे अनेक उदाहरणांवरून सिद्ध झाले आहेनियंत्रित वातावरणात केलेल्या एका प्रयोगात ‘मंत्रोच्चारामुळे ज्योतीची उंची वाढते’असे लक्षात आले

कर्मा लेकलँड यांचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आश्वनी खुराना यांच्यासह शॉन क्लार्क.

सध्या पृथ्वीवर होत असलेले पर्यावरणातील पालट हे ९८ टक्के चक्रिय (सायक्लिकलबदलांमुळे आहेततर केवळ २ टक्के मानवामुळे घडून येत आहेतपॅरिस येथील परिषदेत पर्यावरणातील बदलांविषयी जी काही प्रारूपे आणि अंदाज बांधण्यात आले होतेत्यापेक्षा पुष्कळ अधिक वेगाने अन् तीव्रतेने पर्यावरणाचा र्‍हास होतांना दिसत आहेवर्ष २००६ मध्येच या विषयावर आध्यात्मिक संशोधन करणार्‍या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने पर्यावरणाच्या या तीव्र र्‍हासाचे कारण केवळ स्थूलातील नसून सूक्ष्मातील अर्थात् आध्यात्मिकही आहेअसे अनुमान काढले होते.

या परिषदेत प्राचीन भारतीय शास्त्रांवर आधारित आध्यात्मिक सूत्रांच्या साहाय्याने वातावरणातील पालटांची तीव्रता न्यून करण्याचा महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे’असे मत आय.एस्.आर्.एन्.चे प्रमुख कार्यकारी अधिकारी तोष गुप्ता आणि पर्यावरणतज्ञ अन् कर्मा लेकलँड यांचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आश्वनी खुराना यांनी व्यक्त केले

गेल्या ८ वर्षांत‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने २० राष्ट्रीय आणि ९६ आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेतयांपैकी १४ आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदांमध्ये विश्वविद्यालयाला उत्कृष्ट सादरीकरणाचे पुरस्कार मिळाले आहेत