Connect with us

गोवा खबर

न्यायमूर्ती गवई यांची नालसाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

Published

on

Spread the love
गोवा खबर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांची राष्ट्रीय कायदा सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.

न्यायमूर्ती संजीव खन्ना राष्ट्रीय कायदा सेवा प्राधिकरणाचे आधीचे कार्यकारी अध्यक्ष होते. नालसाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती होण्यापूर्वी न्या. गवई हे सर्वोच्च न्यायालयाच्या कायदा सेवा समितीचे अध्यक्ष होते. कार्यकारी अध्यक्ष या नात्याने ते सर्व नागरिकांना विशेषत: समाजातील उपेक्षित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांसाठी सुलभ आणि विनामूल्य कायदेशीर मदत प्रदान करण्याच्या नालसाच्या मोहिमेचे नेतृत्व करणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांची सर्वोच्च न्यायालयाच्या कायदा सेवा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी हे नामांकन केले आहे. हे पद पूर्वी न्या. गवई यांच्याकडे होते.