Connect with us

गोवा खबर

ताश्कंद आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळावा २०२४ मध्ये ठसा उमटवण्यासाठी गोवा पर्यटन सज्ज

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा पर्यटन सीएईएक्स, ताश्कंद, उझबेकिस्तान येथे २१ ते २३ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळावा (टीआयटीएफ) २०२४ मध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज आहे. हा प्रतिष्ठित मेळावा, पर्यटन उद्योगातील एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून ओळखले जाते. ज्यात विविध देशांतील भागधारकांना त्यांच्या सेवांचे प्रदर्शन करण्यासाठी, सहकार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, सर्वोत्तम सुट्टीच्या पॅकेजेबाबत चर्चा करण्यासाठी, पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी, राहण्याच्या पर्यायांवर चर्चा करण्यासाठी एकत्र येण्याची संधी मिळते. 

गोवा पर्यटनाचे शिष्टमंडळ राज्याच्या वैविध्यपूर्ण आणि अद्वितीय पर्यटन अनुभवांवर प्रकाश टाकेल. ज्यामध्ये समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि विलोभनीय किनारपट्टी क्षेत्रापासून, ते उदयोन्मुख अंतर्गत स्थळे आणि पर्यावरणीय पर्यटनाच्या संधींचा समावेश आहे. यात स्थानिक समुदाय, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेला फायदेशीर ठरणाऱ्या शाश्वत पद्धतींद्वारे पुनरुत्पादक पर्यटनाप्रती, गोव्याच्या बांधिलकीला चालना देण्यावर आणि उझबेकिस्तान तसेच जवळपासच्या देशांतील पर्यटकांचा गोव्याकडे प्रवाह वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

पर्यटन मंत्री रोहन  खंवटे म्हणाले, शाश्वत पर्यटनाच्या क्षेत्रात उदाहरणासह पुढे जाण्याची गोव्याची दृष्टी आहे. टीआयटीएफ २०२४ आम्हाला जागतिक उद्योगातील पुढाऱ्यांसोबत जोडण्यासाठी आणि आमच्या निसर्गाला प्राधान्य देणाऱ्या पर्यटन आराखड्याला तसेच आर्थिक विकासाला चालना देताना, वारसा आणि स्थानिक संस्कृती जतन करण्याचे आमचे प्रयत्न, सामायिक करण्यास योग्य व्यासपीठ प्रदान करेल. गोव्याला केवळ एक गंतव्यस्थान बनवण्याचा आमचा उद्देश नाही, तर एक जबाबदार आणि पुनरुत्पादनाची चळवळ बनवून, पर्यटन व गोव्याच्या पाहुणचाराचा आनंद घेण्यासाठी इतर देशांतून येणाऱ्या पर्यटकांची सोय करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

गोव्याच्या सहभागावर भाष्य करताना पर्यटन संचालक आणि जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील अंचिपाका, आयएएस पुढेम्हणाले, टीआयटीएफ २०२४ मधील आमची उपस्थिती, ही गोव्याला त्याच्या समुद्रकिनाऱ्यां पलीकडे जाणारे, सर्वांगीण प्रवासाचे ठिकाण म्हणून स्थान देण्याची एक महत्त्वपूर्ण संधी असेल. गोव्याचे वेलनेस, साहसी, आध्यात्मिक, वारसा सारख्या ऑफबीट अनुभवांचे प्रदर्शन करण्याचे आमचे ध्येय आहे, जे आमच्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन करणाऱ्या जबाबदार व शाश्वत पर्यटन पद्धतींबद्दलच्या वचनबद्धतेवर जोर देईल. ताश्कंद ते गोवा असे आढवड्याला २ वेळा थेट उड्डाणांच्या अलीकडेच सुरू झालेल्या एअरबस ए३२० निओच्या प्रगत सेवेद्वारे ताश्कंद, मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (मोपा) ला जोडले जाईल. याबरोबरच उझबेकिस्तान आणि गोवा दरम्यान पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी नवीन मार्ग सुरू होईल.

ताश्कंद, उझबेकिस्तान येथील भारतीय दूतावास प्रवासी मेळाव्या दरम्यान गोव्याच्या सहभागास सक्रिय आणि भक्कम पाठिंबा देत आहे. या कार्यक्रमा दरम्यान, गोवा पर्यटनाचे दालन अभ्यागत, ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना आकर्षित करेल, ज्यामुळे गोव्याच्या पर्यटन क्षेत्रामध्ये संभाव्य सहयोग आणि गुंतवणूकीवर अनेक चर्चा होतील. गोव्याची आंतरराष्ट्रीय जोडणी वाढवण्यासाठी आणि अस्सल व तल्लीन अनुभव शोधणाऱ्या प्रवाशांसाठी, एक पसंतीचे गंतव्यस्थान म्हणून गोव्याचा प्रचार करण्यासाठी, प्रमुख उद्योग नेत्यांशी संवाद साधण्याचीही शिष्टमंडळाची योजना आहे.

ताश्कंद आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळावा २०२४ गोवा पर्यटनासाठी एक आदर्श व्यासपीठ प्रदान करेल, ज्यामुळे पर्यटनाला सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या साधनात रुपांतरित करण्याच्या आमच्या दृष्टीकोनाला बळकटी मिळेल. हा सहभाग म्हणजे गोव्याची जागतिक पर्यटन भागीदारी वाढविण्यासाठी, बाजारपेठेचा विस्तार करण्यासाठी आणि राज्याच्या दोलायमान परिसंस्थेचे रक्षण करण्यासाठी तसेच उच्च दर्जाचे पर्यटन आकर्षित करून, स्थानिक समुदायांना लाभ देणारे आमचे धोरणात्मक उपक्रम प्रतिबिंबित करते.

पर्यटन विभाग टीआयटीएफ २०२४ मधील आपल्या सहभागाच्या यशावर, नाविन्यपूर्ण पर्यटन उपायांच्या दिशेने प्रवास सुरू ठेवण्यासाठी आणि शाश्वत तसेच पुनरुत्पादक प्रवासात नवीन स्तर स्थापित करण्यास उत्सुक आहे.