Connect with us

गोवा खबर

भातपिकांचे अवशेष न जाळण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

Published

on

Spread the love

गोवा खबर: भाताची कापणी केल्याने शेतात आणि शेताबाहेर मोठ्या प्रमाणात अवशेष निर्माण होतात. शेतकऱ्यांतर्फे पुढील पिकाच्या पेरणीसाठी शेत स्वच्छ करण्यासाठी पिकांच्या अवशेषांचा मोठा भाग ‘शेतीवर’ जाळला जातो. पिकांचे अवशेष जाळल्याने वातावरणात प्रदूषणाची समस्या निर्माण होते आणि मोठ्या प्रमाणात पोषणाची हानी होते आणि जमिनीची सुपीकताही कमी होते.

नवी दिल्लीतील केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने भात पेंढा आणि इतर कृषी अवशेषांच्या सर्वसमावेशक व्यवस्थापनासाठी निर्देश दिले आहेत.

भात कापणी आधीच सुरू झाली असल्याने, कृषी संचालनालय शेतकरी समाजामध्ये पिकांचे अवशेष जाळणे थांबविण्यासाठी आणि पर्यावरणाचे प्रदूषण टाळण्यासाठी त्याचा योग्य वापर करण्यासाठी जनजागृती करीत आहे.

कृषी संचालनालयाने सर्व शेतकऱ्यांना पिकांचे अवशेष जाळण्याऐवजी पुनर्वापर करण्याचे किंवा योग्य वापर करण्याचे आवाहन केले आहे.