गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोहिणी गोडबोले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. विज्ञान जगतात अधिकाधिक महिलांसाठी खंद्या समर्थक राहिलेल्या गोडबोले या वैज्ञानिक आणि नव प्रवर्तक होत्या असा गौरवपूर्ण उल्लेख मोदींनी केला.
त्यांचे शिक्षण विषयक प्रयत्न पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करत राहतील, असेही त्यांनी नमूद केले.