Connect with us

गोवा खबर

भाजप सदस्य नोंदणीबाबत सत्तरीने मारली बाजी

Published

on

Spread the love

गोवा खबर : सदस्य नोंदणीबाबत सत्तरी तालुक्याने बाजी मारली असून वाळपई मतदारसंघात 21 हजार 163 आणि पर्ये मतदारसंघात 19 हजार 99 सदस्य मिळून सत्तरी तालुक्यात भाजपची एकूण सदस्य संख्या 40 हजार 262 झाली आहे.

पर्ये मतदारसंघात आतापर्यंतचे सर्वाधिक सदस्य नोंद झाले आहेत. गोव्यात सदस्यता नोंदणीबाबत वाळपई मतदारसंघाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यापाठोपाठ पर्ये मतदारसंघाचा क्रमांक लागतो.

डिचोलीपेक्षा सत्तरी तालुक्यात तीन हजार भाजप सदस्य जास्त झाले आहेत. मये मतदारसंघात 10 हजार 372 भाजप सदस्य झाले आहेत. डिचोली मतदारसंघात आता 9 हजार 410 सदस्य नोंद झाले आहेत. साखळी मतदारसंघात मुख्यमंत्री प्रमोद सावंत व भाजप कार्यकर्त्यांनी मिळून एकूण 17 हजार 159 सदस्यांची नोंदणी केली आहे.