Connect with us

गोवा खबर

राष्ट्रीय पॅरा-जलतरण स्पर्धा २०२४ ला प्रारंभ; २२ स्पर्धा प्रकारांमध्ये स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग

Published

on

Spread the love
गोवा खबर :  राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप-२०२४चे उद्घाटन मोठ्या दिमाखात झाले. पहिल्याच दिवशी भारतभरातून आलेल्या पॅरा-ॲथलीट्नी आपल्या अतुलनीय प्रतिभेचे प्रदर्शन सादर केले. राज्य दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग, भारतीय पॅरालिम्पिक समिती, गोवा क्रीडा प्राधिकरण यांच्या सहकार्याने राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम सर्वसमावेशकता आणि क्रीडाकौशल्यांच्या उत्कृष्टतेचा उत्सव म्हणून साजरा केला जात आहे.
या समारंभास राज्याचे क्रीडामंत्री गोविंद गावडे, दिव्यांगजन सक्षमीकरण मंत्री सुभाष फळदेसाई, गोवा राज्याचे मुख्य सचिव डॉ. पुनीत कुमार गोयल (IAS), राज्य दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे सचिव ई. वल्लवन (IAS), राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच वर्ल्ड अॅक्वाटिक्स ब्युरोचे सदस्य व मडगावचे आमदार दिगंबर कामत, गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालिका डॉ. गीता नागवेकर आणि राज्य क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयाचे अरविंत खुटकर, राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या संचालिका वर्षा नाईक आणि राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाचे सचिव ताहा हाजिक, त्याचबरोबर भारतीय पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्ष देवेंद्र झाझरिया, सरचिटणीस जयवंत सिंह आणि डॉ. व्ही. के. दबस यांच्यासह विविध पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या स्पर्धेचे उद्घाटन झाले.
पुरुष, महिला, ज्युनियर आणि सब-ज्युनियर विभागांसह विविध श्रेणींमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांनी पहिल्या दिवशी तब्बल २२ स्पर्धा पार पडल्या. S-4 ते S-10 या श्रेणींमध्ये वैयक्तिक आणि फ्रीस्टाइल अशा दोन्ही प्रकारांमध्ये असलेल्या स्पर्धांमधून खेळाडूंमधील वैविध्यता, स्पर्धाक्षमता आणि स्पर्धाक्षमता वाढवण्यावर भर दिला जात आहे.
पॅरा-ॲथलीट्सना आपले कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वपूर्ण व्यासपीठ छरत आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश अशा विविध राज्यांतून सहभागी झालेल्या खेळाडूंनी पहिल्याच दिवशी जोरदार प्रदर्शन सादर करत स्पर्धेची चुरस वाढवली. खेळभावना आणि सर्वसमावेशकतेची भावना प्रतिबिंबित करण्याबरोबरच या स्पर्धेतून सहभागी स्पर्धकांनी केलेले कठोर परिश्रम आणि त्यांच्या अंगी असलेला अढळ निश्चय हे गुण अनुभवायला मिळत आहे.
स्पर्धा जसजशी पुढे सरकत जात आहे, विविध स्पर्धांप्रकारांना सुरूवात होत असल्याने सहभागी खेळाडूही आपल्या क्षमतांचे परिघ विस्तारताना दिसत असून त्यातून अनेकांना प्रेरणा मिळत जाणार आहे. राष्ट्रीय पॅरा-जलतरण स्पर्धा-२०२४मध्ये उद्याही आणखी रोमांचक, चुरशीचे क्षण अनुभवायला मिळणार आहेत.