Connect with us

गोवा खबर

स्वदेश दर्शन योजना २.० अंतर्गत पायाभूत सुविधा विकासासाठी कोलवा समुद्रकिनारा सज्ज

Published

on

Spread the love
गोवा खबर : गोव्यातील सर्वात प्रतिष्ठित आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध स्थळांपैकी एक असलेला कोलवा समुद्रकिनारा, डबल इंजिन सरकारच्या मदतीने स्वदेश दर्शन योजना २.० अंतर्गत सर्वसमावेशक पायाभूत सुविधा विकासासाठी सज्ज आहे. स्थानिक वातावरणाचे रक्षण करताना, स्थानिक व्यवसायाच्या उपजीविकेला आधार देऊन, पर्यटकांना सर्वोत्तम अनुभव देणे, हा प्रकल्पाचा उद्देश आहे.
पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्यासह बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगास, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत, बाणावलीचे पंचायत सदस्य आणि प्रमुख भागधारकांनी आगामी विकास प्रकल्पाच्या व्याप्तीवर चर्चा करण्यासाठी कोलवा समुद्रकिनाऱ्याला भेट दिली. प्रकल्पाचा पहिला टप्पा ५ जानेवारी २०२५ नंतर सुरू होणार आहे. स्थानिक विक्रेते आणि व्यवसायाच्या दैनंदिन कामकाजात कमीत कमी व्यत्यय येईल, याची खात्री करून, येथे वाईट परिस्थितीत असलेल्या पायाभूत समस्यांचे निराकरण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
हा उपक्रम शाश्वत पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि राज्याच्या सांस्कृतिक व नैसर्गिक आकर्षणांमध्ये वाढ करण्याच्या, गोवा सरकारच्या मोठ्या वचनबद्धतेचा एक भाग आहे, यावर खंवटे यांनी भर दिला. ते म्हणाले, हा प्रकल्प कोलवा समुद्रकिनाऱ्याला जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवून विकसित करेल, तसेच स्थानिक समुदायाच्या पारंपरिक उपजीविकेचे रक्षण होईल, याची खात्री करेल.
मंत्री खंवटे  म्हणाले, स्वदेश दर्शन योजनेचा एक भाग म्हणून, भारत सरकार सर्वांगीण पर्यटन विकासावर लक्ष केंद्रित करत आहे आणि गोवा या योजनेचा एक लक्षणीय लाभार्थी होण्यासाठी सज्ज आहे. या विकासकामांमध्ये कचरा व्यवस्थापन, समुद्रकिनाऱ्यावर सुलभ प्रवेश, सार्वजनिक सुविधा, नवीन पूल आणि पुलांची पुनर्रचना, शॉपिंग अँनेक्सचर आणि दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष सुविधा असतील. तसेच येथे येणाऱ्या इतर अत्यावश्यक पायाभूत सुविधा, स्वच्छ आणि अधिक पर्यटकांसाठी अनुकूल असा कोलवा समुद्रकिनारा सुनिश्चित करेल.
आमदार कामत म्हणाले, कोलवा समुद्रकिनारा हे दक्षिण गोव्यातील महत्त्वाचे ठिकाण असून, अलीकडच्या काळात या समुद्रकिनाऱ्याचा झालेला विकास खूप उत्साहपूर्ण आहे. स्थानिक समुदायाच्या पाठिंब्याने, आम्ही कोलवा समुद्रकिनाऱ्यावर सुधारित पायाभूत सुविधा पाहण्याची, अपेक्षा ठेवू शकतो.
आमदार व्हिएगास यांनी मंत्र्यांच्या विचार व भावनांचा पुनरुच्चार करत, या उपक्रमाला पाठिंबा व्यक्त केला आणि स्थानिक रहिवासी तसेच  अभ्यागत दोघांसाठीही त्याचे महत्त्व अधोरेखित केले.