गोवा खबर : मंत्री रोहन खंवटे यांच्या नेतृत्वाखालील आयटीईअँडसी विभाग, जी-टेक ३.० या गोव्यातील सर्वात मोठ्या मल्टीव्हर्स टेक्नॉलॉजी (तंत्रज्ञान) एक्स्पोला पाठिंबा देतो. कॉम्प्युटर डीलर्स फोरम ऑफ गोवा (सीडीएफजी) द्वारे आयोजित, हा तीन दिवसीय कार्यक्रम १७-१९ ऑक्टोबर दरम्यान इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृह, पणजी येथे सकाळी १० ते संध्याकाळी ७ पर्यंत खुला आहे.
कौशल्य विकासाला चालना देणे, स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान नवकल्पकांना त्यांची अत्याधुनिक उत्पादने दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हे या प्रदर्शनाचे उद्दिष्ट आहे. यात सहभागी, उद्योगातील पुढाऱ्यांसह परस्पर प्रात्यक्षिके आणि नेटवर्किंग संधींद्वारे नवनवीन तांत्रिक ट्रेंड जाणून घेऊ शकतात.
डीआयटीईअँडसी मंत्री रोहन खंवटे यांनी इन्फोटेक कॉर्पोरेशन ऑफ गोवा लिमिटेडचे अध्यक्ष, डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्यासमवेत या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. मंत्री खंवटे यांनी भर देताना सांगितले, कि “उत्कृष्ट विचार आणि नाविन्यपूर्ण व्यवसाय मॉडेल एकत्र आणण्यासाठी गोमंतकीयांचे एकत्रित प्रयत्न, खरोखरच प्रेरणादायी आहेत. जेव्हा आपण स्वयंपूर्ण गोवा आणि आत्मनिर्भर भारत बद्दल बोलतो, तेव्हा तंत्रज्ञान हे आज आणि भविष्यात निर्णायक भूमिका बजावते. जितक्या लवकर आपण स्वतःला त्यात सुसज्ज करू, तितके आपण यशाच्या जवळ जाऊ.” त्यांनी स्टार्टअप्सच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे कौतुक केले आणि स्टार्टअप व आयटी प्रमोशन सेलला पाठिंबा व समर्थन देण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
गोवा सरकारच्या स्टार्टअप आणि आयटी प्रमोशन सेल (एसआयटीपीसी) द्वारे समर्थित गोवा-आधारित स्टार्टअप, विविध उद्योगांमध्ये नाविन्यपूर्ण उपाय सादर करत, या एक्स्पोमध्ये सहभागी होत आहेत. या स्टार्टअप्समध्ये एसियर सोल्युशन्स ही एड-टेक कंपनी आहे, जी आपल्या स्टीम (एसटीईएम) शैक्षणिक किटद्वारे मुलांना तांत्रिक कौशल्ये शिकवण्यात विशेष आहे. स्पेशियलक्राफ्ट, जे स्मार्ट इंटरएक्टिव्ह डिजिटल नकाशे (एसआयडीएम™), जीआयएस आणि रिअल इस्टेटसाठी ड्रोन उपाय प्रदान करून, प्रगत डेटा विश्लेषणासह निर्णय घेणे सुलभ करते. कोडरिक्स, एक पूर्ण-सेवा वेब डेव्हलपमेंट कंपनी, वापरकर्त्यासाठी अनुकूल आणि नाविन्यपूर्ण डिजिटल उपाय देत आहे. परसेप्शनिस्ट सोल्युशन्स आपली नाविन्यपूर्ण क्युआर सोल्यूशन्स सादर करत आहे, तर राचेन इंजिनियरिंग सोल्युशन्स हॉस्पिटॅलिटी उद्योगासाठी डिझाइन केलेल्या वायरलेस सहाय्य प्रणालीचे प्रदर्शन करत आहे.
जी-टेक ३.० विद्यार्थी, व्यावसायिक आणि तंत्रज्ञान प्रेमींना नवनवीन आयटी आणि तंत्रज्ञान नवकल्पना शोधण्यासाठी आणि त्यात गुंतण्यास आमंत्रित करते. हा कार्यक्रम तांत्रिक प्रगतीचे केंद्र म्हणून गोव्याच्या वाढत्या प्रतिष्ठेचा पुरावा आहे.