Connect with us

गोवा खबर

एका पत्रकाराने दुसऱ्या पत्रकाराची दखल घेऊन गौरव करणे ही एक दुर्मिळच घटना. ॲड शैलेश गावस 

Published

on

Spread the love
गोवा खबर:पत्रकारांना फिल्डवर काम करत असताना अनेक अडचणी येतात, त्या अडचणीचा सामना करत पत्रकार सामाजिक माध्यमाद्वारे काम करत असतात.परंतु एका पत्रकाराने दुसऱ्या पत्रकाराची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे ही घटना दुर्मिळच आहे. असे गौरवद्गार सामाजिक कार्यकर्ते ॲडबशैलेश गावस यांनी जुने गोवा येथील सिटी न्यूज आणि शब्द शारदा परिवारा मार्फत मोरजी येथील जेष्ठ पत्रकार निवृत्ती शिरोडकर यांचा सत्कार आयोजित केला होता. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. 
यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते मुन्नालाल हलवाई, शब्द शारदा परिवाराचे कमलाकर हमरस्कर, सिटी न्यूजचे फजलून टोन्से, आदी व्यासपीठावर होते.
एडवोकेट शैलेश गावस यांच्यात हस्ते पत्रकार निवृत्ती शिरोडकर यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि स्मृती देऊन सत्कार केला.
ॲड शैलेश गावस यांनी पुढे बोलताना सांगितले की पत्रकार निवृत्ती शिरोडकर यांचं कार्य आम्ही जवळून पाहिलेले आहे. त्यांची ओळख जरी उशिरा झाले असले तरी अनेक टीव्ही चॅनेल मधून जे प्रश्न आमदार मंत्र्यांना सडेतोड विचारतात. त्यातूनच आमदारांना आणि मंत्र्यांनाही दखल घ्यावी लागते. असे सडेतोड प्रश्न विचारून लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारिता आहे. ती शाबूत ठेवण्याचं काम शिरोडकर प्रमाणेच अनेक पत्रकारांनी केल्याचेही शैलेश गावस यांनी सांगितले.
सुरुवातीला शब्द शारदाचे कमलाकर हम्रस्ककर यांनी पत्रकारिता क्षेत्रांमध्ये कार्य करत असताना कशा प्रकारच्या अडचणींचा सामना करून गावात काम करावं लागतं. याचा थोडक्यात आढावा घेत असताना सूत्रसंचालन आणि प्रास्ताविकही त्यांनी केले.
पत्रकार निवृत्ती शिरोडकर यांनी सत्काराला उत्तर देत असताना प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया याच्यामध्ये जरी स्पर्धा असली तरीही दोन्ही माध्यमे आज महत्त्वाची ठरत आहे. आजची घटना लगेच पुरवण्याचं काम इलेक्ट्रॉनिक मीडिया ब्रेकिंग द्वारे करत असतात तर वर्तमानपत्राची बातमी सविस्तरपणे दुसऱ्या दिवशी येत असते.
पत्रकारांना शहरात आणि ग्रामीण भागामध्ये काम करताना कशा प्रकारच्या अडचणी येतात. याचे अनुभव आणि याचे कथन निवृत्ती शिरोडकर यांनी करत असताना पूर्वीच्या वेळी आम्ही पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होतो. त्यावेळी ग्रामीण भागात फॅक्स इंटरनेट अशा प्रकारची सोय नव्हती. त्या काळात घरात घटनास्थळी जाऊन बातमीच वृत्तांत केल्यानंतर ती कागदावर लिहायची आणि पणजी येऊन कार्यालयामध्ये पोहोचवयची.
संध्याकाळी जर अशा घटना घडल्या तर पुन्हा एकदा पणजीला यावं लागतं. आज घर बसल्या किंवा आपण ज्या ठिकाणी घटनास्थळी असतो. तिथूनही बातमी पुरवण्याचं काम आजच्या माध्यमातून होत असल्याने सांगून ग्रामीण भागातील पत्रकारांना कशा प्रकारच्या अडचणी येतात. आणि अल्प मानधन घेऊन ते काम करत असतात. त्या सर्व अडचणी सरकारने समजावून घेऊन त्या सोडवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. आपला सत्कार घडवून आणल्याबद्दल शिरोडकर यांनी सर्वांचे आभार मानले.
अमर यांनी शेवटी आभार व्यक्त केले.