गोवा खबर:आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेने गोवा राज्यात १० नोव्हेंबर २०२४ रोजी मिरामार सर्कल येथे राष्ट्रीय रेड रनचे आयोजन केले आहे.
अंतिम फेरीनंतर पारितोषिक वितरण समारंभ होईल ज्यामध्ये विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि विविध सरकारी खात्याचे अधिकारी उपस्थित राहतील.

आरोग्य सेवा संचालनालयात कार्यक्रमाच्या तयारीबाबत चर्चा करण्यासाठी संबंधितांची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली. गोवा राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या प्रकल्प संचालक डॉ. ललिता उमरसकर या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. आयईसीचे सल्लागार आणि एमएस नाकोचे श्री वेदित बेंजामिन फ्रँकलिन आणि उपसंचालक, युथ विंग श्रीमती. पारुल सिंग, तसेच इतर राज्य सरकारी अधिकारी या बैठकीला उपस्थित होते आणि रेड रन कार्यक्रमासंदर्भात विविध पैलूंवर चर्चा केली.
रेड रन स्पर्धा १० किमी अंतराची असेल ज्यामध्ये विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून तीन विजेते निवडले जातील. राज्यातील सर्वसामान्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी दोन किलोमीटरची रन खुली आहे.
हा उपक्रम आयोजित करण्यामागील संकल्पना तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करणे तसेच मानसिक आरोग्य आणि इतर सार्वजनिक आरोग्य समस्यांसोबतच एचआयव्ही/एड्स या जीवघेण्या आजाराशी संबंधित माहिती करून देणे हा या रेड रनचा उद्देश आहे.