गोवा खबर:मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यातील जनतेचे वतीने गोवा मुक्ती संग्रामाचे जनक डॉ त्रिस्तांव ब्रागांझा कुन्हा यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली.
मुख्यमंत्र्यांनी पणजीतील आझाद मैदानावरील डॉ. टीबी कुन्हा यांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करून गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल त्यांना आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री सावंत यांनी स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करून भावी पिढीने गोव्याच्या स्वातंत्र्याचा लढा जाणून घेण्याचे ते म्हणाले.
वीज मंत्री श्री रामकृष्ण उर्फ सुदिन ढवळीकर, मुख्य सचिव श्री पुनीतकुमार गोयल, आयएएस, आयपीएस, डीजीपी गोवाचे श्री आलोक कुमार, सचिव (वित्त) डॉ व्ही कांदावेलू, आयएएस, गोवा दमण दीव स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास नाईक देसाई यांच्यासह इतर मान्यवरांनीही डॉ टीबी कुन्हा यांना आदरांजली वाहिली.
पोलीस बँडने लास्ट पोस्ट धून आळवून मानवंदना दिली .