गोवा खबर:भारत सरकारच्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उध्योग मंत्रालयाच्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उध्योग विकास आणि सुविधा कार्यालय, गोवा यांनी गोवा सरकारच्या उध्योग, व्यापार आणि वाणिज्य संचालनालय, हस्तकला, कापड आणि काथ्याकाम संचालनालय, सीएससी केंद्र आणि इतर व्यावसायिकांच्या सहकार्याने पीएम विश्वकर्मा योजनेखाली २७ ते २९ सप्टेंबर २०२४ पर्यंत बीपीएस स्पोर्टस् क्लब, मडगाव येथे प्रदर्शन तथा व्यापार मेळाव्याचेआयोजन केले आहे. सकाळी १०.०० ते संध्या ७.०० अशी प्रदर्शनाची वेळ आहे.
सुतारकाम, बोट बांधकाम, शस्त्रे तयार करणारे, लोहार, हातोडी आणि टुलकीट तयार करणारे, कुलुप तयार करणारे, सुवर्णकार, कुंभार, शिल्पकार, दगड फोडणारे, चामार, गंवडी, बास्केट तयार करणारे, चटई तयार करणारे, काथ्याकाम, झाडू तयार करणारे, खेळणी तयार करणारे, न्हावी, फुलहार तयार करणारे, धोबीं, टेलर, जाळी विणणारे, असे १८ व्यावसायिक प्रदर्शनात बाग घेतील.
गोवा राज्यांतील पारंपारिक व्यावसायिकांची उत्पादने आणि सेवांना व्यापार सुविधा देणे आणि विश्वकर्मांच्या कामाविषयी आणि सूक्ष्म, लघू आणि मध्यम उध्योगासंबंधी जागृती करणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.