गोवा खबर : माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे आणि विजयादेवी राणे यांच्या वतीने शुक्रवारी अंबाबाईला 17 तोळे 54 ग्रॅमचा सोन्याचा दोन पदरी साज आणि 20 तोळे 590 ग्रॅमचे सोन्याचे तोडे अर्पण करण्यात आले.
राणे यांचे चिरंजीव आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे हे दागिने सुपूर्द केले. यातील सोन्याच्या साजची किंमत 13 लाख 76 हजार 750 इतकी, तर सोन्याच्या तोड्याची किंमत 16 लाख 34 हजार 26 इतकी आहे. या दोन्ही दागिन्यांचे एकत्रित मूल्य 30 लाख 11 हजार 17 रुपये इतके आहे.