गोवा खबर : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T63 प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल शरद कुमार याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले; शरद कुमारने #पॅरालिम्पिक2024 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T63 मध्ये रौप्यपदक जिंकले! सातत्य आणि उत्कृष्टतेसाठी त्याचे कौतुक केले जाते. त्याचे अभिनंदन. तो संपूर्ण देशाला प्रेरित करतो.

दीप्ती जीवनजी
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये महिलांच्या 400 मीटर T20 प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल धावपटू दीप्ती जीवनजी हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.
तिचे कौशल्य आणि दृढ निर्धाराचे कौतुक करत मोदी यांनी एक्स वर पोस्ट केले, पॅरालिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 400 मीटर T20 प्रकारात नेत्रदीपक कांस्यपदक पटकावल्याबद्दल दीप्ती जीवनजी हिचे अभिनंदन. असंख्य लोकांसाठी ती प्रेरणास्त्रोत आहे. तिचे कौशल्य आणि दृढ निर्धार वाखाणण्याजोगा आहे.

अजित सिंग
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल अजित सिंग याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले. अजित सिंगने पुरुषांच्या भालाफेक F46 प्रकारात रौप्य पदक जिंकले. पंतप्रधानांनी पोस्टमध्ये म्हटले आहे; पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या भालाफेक F46 प्रकारात रौप्य पदक जिंकून अजित सिंग याने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. खेळाप्रती त्याची बांधिलकी आणि चिकाटीचा भारताला अभिमान वाटतो.

सुंदर सिंग गुर्जर
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या भालाफेक F46 प्रकारात कांस्य पदक पटकावणाऱ्या सुंदर सिंग गुर्जर याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले; #पॅरालिम्पिक2024 मध्ये पुरुषांच्या भालाफेक F46 प्रकारात कांस्यपदक जिंकणाऱ्या सुंदर सिंग गुर्जरची अभूतपूर्व कामगिरी! त्याचे समर्पण आणि चिकाटी उल्लेखनीय आहे. या यशाबद्दल अभिनंदन!

मरियप्पन थंगावेलू
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या उंच उडी T63 प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल ॲथलीट मरियप्पन थंगावेलूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले. पॅरालिम्पिकच्या सलग तीन स्पर्धांमध्ये विजयाची मालिका कायम राखणाऱ्या मरियप्पनचे सातत्य आणि कौशल्य याची मोदी यांनी प्रशंसा केली. पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले, पुरुषांच्या उंच उडी T63 प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल मरियप्पन थंगावेलूचे अभिनंदन. पॅरालिम्पिकच्या सलग तीन स्पर्धांमध्ये त्याने पदके जिंकली हे कौतुकास्पद आहे. त्याचे कौशल्य, सातत्य आणि दृढ निर्धार वाखाणण्याजोगा आहे.