Connect with us

गोवा खबर

भारत आणि मलेशियाने सामंजस्य करारावर केली स्वाक्षरी

Published

on

Spread the love

गोवा खबर : भारत आणि मलेशिया दरम्यान संबंध अधिक मजबूत  करण्यासाठी, भारत आणि मलेशियाने सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. भारताचे पर्यटन मंत्रालय  आणि मलेशियाचे पर्यटन, कला आणि संस्कृती मंत्रालय यांच्यात पर्यटन क्षेत्रातील सहकार्य मजबूत करण्यासाठी करार झाला.

20 ऑगस्ट रोजी भारताचे पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि मलेशियाचे पर्यटन, कला आणि संस्कृती मंत्री  वाय बी दातो  टियोंग किंग सिंग यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

सामंजस्य कराराची मुख्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:

  • पर्यटन उत्पादने आणि सेवांचा प्रचार आणि विपणन;
  • आदानप्रदान कार्यक्रमांसह पर्यटन संशोधन, प्रशिक्षण आणि विकास क्षेत्रात विस्तार;
  • पर्यटन संबंधी पायाभूत विकास , सुविधा, उत्पादने आणि सेवांमधील गुंतवणुकीला  प्रोत्साहन देणे;
  • वैद्यकीय पर्यटन क्षेत्रातील माहितीची देवाणघेवाण करणे आणि उत्पादनाच्या प्रचारासाठी हितधारकांना प्रोत्साहित करणे;
  • व्यवसाय पर्यटन, ज्यामध्ये सभा, प्रोत्साहन, परिषदा, प्रदर्शने (MICE) असतील ;
  • पर्यटन हितधारक, टूर ऑपरेटर्स  आणि ट्रॅव्हल एजंट यांच्यातील सहकार्याला प्रोत्साहन देणे;
  • समुदाय-आधारित पर्यटन आणि इको-टुरिझम आणि जबाबदार पर्यटनाचा प्रचार आणि विकास.

मलेशियातून भारतात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात त्यामुळे भारतासाठी ते एक महत्त्वाचे  पर्यटन स्रोत बाजारपेठ आहे. वर्ष 2022 मध्ये, 2.5 लाखांहून अधिक मलेशियन पर्यटकांनी भारताला भेट दिली. या सामंजस्य करारामुळे मलेशियातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या  आणखी वाढेल अशी आशा आहे.