Connect with us

गोवा खबर

गोवा लोक प्रशासन आणि ग्रामीण विकास संस्थेतर्फे कार्यशाळेचे उद्घाटन

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा लोक प्रशासन आणि ग्रामीण विकास संस्थेतर्फे एला फार्म, ओल्ड गोवा येथे अखिल नागरी सेवेतील अधिकाऱ्यांसाठी आयोजित भारतीय नागरी सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता आणि भारतीय शिक्षा अधिनियम या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.

महसूल सचिव आणि गोवा लोक प्रशासन आणि ग्रामीण विकास संस्थेचे उपाध्यक्ष संदीप जॅकीस यांनी नवीन कायदे लागू होणे भारताच्या कायदेशीर परिदृश्यात एक परिवर्तनात्मक क्षण आहे यावर भर दिला. बीएनएसएस, बीएनएस आणि बीएसए ही भविष्याकडे नेणारी पावले असून नवीन भारताची मूल्ये आणि आकांक्षा प्रतिबिंबित करतात.

गोव्यात जेथे पर्यटन हा प्रमुख आर्थिक घटक आहे तेथे प्रभावी कायद्याची अंमलबजावणी महत्त्वपूर्ण आहे. जॅकीस यांनी सुरक्षा राखण्यासाठी आणि सायबर गुन्हे, महिला सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था आणि अंमली पदार्थांची तस्करी यांसारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि नागरी प्रशासन आणि पोलिस दल यांच्यातील सहकार्य मजबूत करण्यासाठी नागरी आणि पोलिस अधिकाऱ्यांनी एकत्र काम करण्याची गरज व्यक्त केली.

सीबीआयचे माजी विशेष संचालक धरम चंद जैन, आयपीएस, यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या प्रत्येक विभागाचे स्पष्टीकरण दिले. सुरवातीस गोवा लोक प्रशासन आणि ग्रामीण विकास संस्थेचे संचालक (प्रशिक्षण) वासुदेव एन शेट्ये यांनी स्वागत केले तर सहाय्यक संचालक डॉ सीमा फर्नांडिस यांनी आभार मानले.