गोवा खबर : अल्पवयीन मुली, युवती आणि महिलांवरील अत्याचारांविरुद्ध कठोर कायद्याची तरतूद करावी तसेच लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू करावा, अशी मागणी काल (29 रोजी) हिंदू जनजागृती समितीने फोंडा येथील क्रांती मैदानात आयोजित केलेल्या निदर्शनांद्वारे केली.
राज्यात 2019 मध्ये 51, 2020 मध्ये 43, 2021 मध्ये 49, 2022 मध्ये 55 आणि 2023 मध्ये 62 अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आले. अत्याचारांच्या घटनांमध्ये दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी जलदगती न्यायालयीन प्रक्रिया चालवावी, मुलीं-मुलांना शाळा-महाविद्यालयांमधून स्वसंरक्षण प्रशिक्षण द्यावे, त्यासाठी हिंदु जनजागृती समितीची ‘रणरागिणी’ शाखा शासन किंवा शाळांचे व्यवस्थापन यांना सर्वतोपरी साहाय्य करण्यास सिद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
ओटीटी आणि मुव्ही प्लॅटफॉर्मवर तरुणांमध्ये अश्लीलता पसरवणारे चित्रपट आणि वेब सीरिज सहज उपलब्ध आहेत. त्यांना वेळीच आळा घालण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
