Connect with us

गोवा खबर

राज्यपाल देणार कॅन्सर आणि डायलिसिस रुग्णांना आर्थिक सहाय्य 

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई  उद्या  (३० रोजी) सकाळी ११.३० वाजता राजभवनातील जुने दरबार सभागृहात आयोजित कार्यक्रमात राज्यपालांच्या निधीतून सुमारे २७२ कर्करोग आणि डायलिसिस रुग्णांना आर्थिक मदत वितरित करतील.

आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे यावेळी उपस्थित राहणार आहेत. पिल्लई यांनी राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर गोव्यातील वंचित लोकांपर्यंत पोहोचण्याचा आणि गरजू लोकांना आर्थिक मदत देण्याचा योजना जाहीर केली. या योजनेखाली राज्यपालांनी डायलिसिस, कर्करोग आणि इतर रुग्णांना आर्थिक सहाय्य वितरीत केले.

गोवा ग्रामसंपूर्ण यात्रेदरम्यान, राज्यपालांनी हजारो किलोमीटरचा प्रवास करून राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरून स्वयंसेवी संस्था, संस्था, वृद्धाश्रम, अनाथाश्रम आणि गरिबांची सेवा करणाऱ्या संस्थानाही आर्थिक मदत दिली आहे. गरजू कॅन्सर, डायलिसिस, इतर रुग्णांना अशा आर्थिक मदतीचे वाटप हे राजभवनच्यावतीने सुरू केलेली ही महत्वपूर्ण कामगिरी आहे.