गोवा खबर : स्वीप उपक्रम आणि आगामी विशेष मतदार यादी उजळणी २०२५ आणि दिव्यांगांचा मतदार यादीमध्ये समावेशाचा एक भाग म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने संजय सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशनच्या सहकार्याने नुकतीच चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत १७-१८ वर्षे वयोगटातील सुमारे १०८ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
संजय सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशनचे मुख्याध्यापक तातू कुडाळकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. या स्पर्धेचे ४ वेगवेगळ्या वयोगटात वर्गीकरण करण्यात आले ज्यामध्ये स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे/ स्मृतिचिन्ह/ प्रमाणपत्रे देण्यात आली तसेच सर्व सहभागींना सीईओ कार्यालयाकडून प्रमाणपत्रे देण्यात आली.
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पर्धा तसेच नावनोंदणी प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांच्या समर्पण, सहभागाचे कौतुक केले आणि आगामी विधानसभा निवडणूक २०२७ साठी नावनोंदणी आणि मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.