Connect with us

गोवा खबर

मतदार यादी तपासणीच्या कामास सुरुवात

Published

on

Spread the love

गोवा खबर : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे मुख्य निवडणूक अधिकार्‍यांच्या कार्यालयाने राज्यातील सर्व चाळीसही विधानसभा मतदारसंघासंबंधित मतदार यादीची तपासणी करण्याच्या कामास 20 ऑगस्टपासून सुरुवात केली आहे. हे काम 18 ऑक्टोबर 2024 पर्यंत चालू राहणार आहे.

संबंधित मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी विधानसभा मतदारसंघाच्या संबंधित भागाच्या बीएलओकडून मतदार यादीची तपासणी करतील. 1 जानेवारी 2025 ही पात्र तारीख ठरवून नवीन मतदारांची नोंदणी, मरण पावलेल्या आणि कायम स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे आणि मतदार यादीतील चुकांची दुरुस्ती करण्याचे काम करतील.

बूथ पातळीवरील अधिकारी घरोघरी भेट देऊन मतदार यादीतील मतदारांची माहिती तपासतील. लोकांनी आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी बूथ पातळीवरील अधिकार्‍यांना सहकार्य करून आवश्यक माहिती द्यावी आणि अचूक मतदार यादी तयार करण्यास मदत करावी, अशी विनंती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केली आहे.