Connect with us

गोवा खबर

मच्छीमारांना मासे सुकवण्यासाठी प्लॅटफॉर्म योजना

Published

on

Spread the love

गोवा खबर : मत्स्योद्योग संचालनालयाने पारंपरिक मच्छीमारांना मासे सुकवण्यासाठी कोलवा येथे प्लॅटफॉर्म भाडेतत्त्वावर देण्याची योजना लागू केली आहे.

पारंपरिक मासे सुकवणार्‍यांना एका प्लॅटफॉर्मसाठी 1 हजार रुपये आकारण्यात येणार आहेत. अर्जदाराने 100 रुपये प्रति प्लॅटफॉर्म सुरक्षा ठेव भरावी, असे कळवण्यात आले आहे.

मासे सुकवण्याचे एकूण 30 प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या मच्छीमारांनी उप-कार्यालय, मच्छीमारी संकुल, कोलवा, सासष्टी येथे उपलब्ध असलेले अर्ज भरावेत, त्यासाठीची शेवटची तारीख 15 सप्टेंबर असल्याचे कळवण्यात आले आहे.