Connect with us

गोवा खबर

पिच स्ट्रॅटेजी आणि यशस्वी स्टार्ट अप उभारण्यासंदर्भात माहितीपूर्ण मास्टरक्लासचे आयोजन

Published

on

Spread the love
  • गोवा सरकारच्या स्टार्टअप आणि आयटी प्रमोशन सेलचा उपक्रम
गोवा खबर : गोवा सरकारच्या स्टार्टअप आणि आयटी प्रमोशन सेलने बीट्स बायोसाइटीएच (BITS BioCytih) गोवा येथे पिच स्ट्रॅटेजी आणि यशस्वी स्टार्ट अप उभारण्यासंदर्भात माहितीपूर्ण मास्टरक्लासचे आयोजन केले होते.
या मास्टरक्लासमध्ये, इच्छुक उद्योजकांना भारतातील अग्रगण्य उद्यम भांडवलदार (venture capitalists) शशांक रणदेव यांनी मार्गदर्शन केले. iSAFE  (इंडिया सिंपल ऍग्रीमेंट फॉर फ्युचर इक्विटी) नोट्स वापरणारी भारतातील पहिली उद्यम भांडवल फर्म 100X.VC चे ते सह-संस्थापक आहेत. रणदेवच्या मास्टरक्लासने पिच स्ट्रॅटेजी आणि यशस्वी स्टार्टअप्स तयार करण्यासंदर्भात  उद्योजकांना माहिती मिळाली.
मास्टरक्लासला विद्यार्थी, स्टार्टअपचे संस्थापक, शिक्षक आणि पीएच.डी.प्राप्त विद्वान उपस्थित होते. सत्राच्या सुरुवातीस उपस्थितांनी त्यांच्या अनोख्या स्टार्टअप कथा सांगितल्या.
रणदेव यांनी त्यांच्या उद्योजकीय प्रवासाचे तपशीलवार सादरीकरण करून मास्टरक्लासला सुरुवात केली. सोबतच त्यांनी 100X.VC च्या परिवर्तनात्मक प्रभावावर प्रकाशझोत टाकला. त्यांच्या  सादरीकरणाचा मुख्य घटक पिचिंगची कला होता.
मास्टरक्लासपासून प्रेरित होऊन पिचिंग तंत्रात वाढ करण्यासाठी आणि त्यांच्या स्टार्टअप विकासाला गती देण्यासाठी कृती करण्यायोग्य धोरणांसह उपस्थित उद्योजक सज्ज झाले. या कार्यक्रमाने गोव्याच्या स्टार्टअप इकोसिस्टमचे आणि भारताच्या उद्योजकीय क्षेत्रामध्ये एक प्रमुख शक्ती बनण्याची क्षमता दर्शविली.