गोवा खबर : भारतात निर्मित गेमिंग उत्पादने बाजारात आणण्यासाठी भारताने आपल्या समृद्ध प्राचीन वारशाचा आणि साहित्याचा लाभ घेतला पाहिजे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. गेमिंग क्षेत्रात एक मोठी उदयोन्मुख बाजारपेठ असून आपण या क्षेत्रात नवीन प्रतिभा आणू शकतो, असेही पंतप्रधान म्हणाले.
आपण प्रत्येक मुलाला स्वदेशात विकसित खेळण्यांकडे आकर्षित करू शकतो. प्रत्येक भारतीय मुलाने, तरुणांनी, माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांसह कृत्रिम बुद्धिमत्ता व्यावसायिकांनी गेमिंग विश्वाचे नेतृत्व करावे आणि केवळ खेळण्यातच नव्हे तर आपली गेमिंग उत्पादने जगात सर्वदूर पोहोचवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी माझी इच्छा आहे, असे पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सांगितले. ॲनिमेशनच्या जगातही आपण आपला दबदबा प्रस्थापित करू शकतो, असेही ते म्हणाले.

भारतातील लोकांना विविध क्षेत्रांमध्ये देशाला जागतिक नेता बनवण्याच्या दिशेने काम करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना नागरिकांना केले.