Connect with us

गोवा खबर

राज्यपालांकडून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, भारतीय राष्ट्रीय चळवळीत आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानाचे आम्ही कृतज्ञतेने स्मरण करतो. परकीय राजवटीपासून आपल्याला मौल्यवान स्वातंत्र्य मिळवून दिल्याबद्दल आम्ही त्यांचा आदर करतो. त्यांच्या बलिदानामुळेच भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश बनला आहे.

महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस, जयप्रकाश नारायण, अरबिंदो घोष, महर्षी दयानंद सरस्वती, मौलाना अबुल कलाम आझाद यांसारख्या स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांच्या निःस्वार्थ बलिदानाचे आपण अभिमानाने स्मरण करूया. तसेच आम्ही आमच्या पराक्रमी चळवळीतील प्रत्येक शुरवीर सैनिकांचे स्मरण करून आपल्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांना आदरांजली अर्पण करूया. या महत्त्वाच्या प्रसंगी, ज्या आदर्शांवर आपल्या राष्ट्राची स्थापना झाली त्या आदर्शांसाठी आपण स्वतःला समर्पित करूया आणि आपल्या देशाचा पाया रचणारी मूल्ये आणि तत्त्वे यावर विचार करूया. हा दिवस केवळ दाखविण्यापुरता प्रसंग होऊ नये तर हा दिवस जगातील प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा आणि देशाला जगात मोठा बनविण्यासाठी कटिबध्द होण्याचा हा दिवस आहे.

नव्या भारताच्या आकांक्षांना अनंत आयाम आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था नवीन उंची गाठत आहे आणि उत्कृष्टतेचे उच्च मापदंड स्थापित करीत आहे. या वर्षी, इस्रोने चांद्रयान-३ चे प्रक्षेपण केले आणि आमचे शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ देशाला नावलौकिक मिळवून देत आहेत. आपल्या गोवा राज्याबद्दल बोलायचे तर ते भारताच्या नकाशावर लहान असले तरी ते शांतता आणि सौहार्दासाठी ओळखले जाते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर चौदा वर्षांनंतर गोवा मुक्त झाला आणि राष्ट्रीय मुख्य प्रवाहात सामील झाला असला तरी, राज्याने विविध क्षेत्रात प्रशंसनीय प्रगती केली आहे हे लक्षात घेता मला आनंद होत आहे. आज गोव्यात दोन कार्यरत विमानतळ आहेत, मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि दाबोली विमानतळ. इतर प्रमुख उपलब्धींमध्ये रस्ते, इमारती, ८ लेन केबलसह नवीन झुआरी पूल, प्रत्येक बाजूला ४ लेन, भारतातील दुसरा सर्वात लांब केबल स्टेड ब्रिज यांचा समावेश आहे. गोवा राज्याने विविध विषयांचा समावेश असलेल्या अनेक प्रतिष्ठित जी-२० बैठकांचे आयोजन केले होते आणि प्रत्येक बैठक सुव्यवस्थित आणि प्रत्येक बाबतीत यशस्वी होती असे राज्यपाल म्हणतात.